भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल विवाहबंधनात

yujvendra-chahal-marriage

नवी दिल्ली – भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल विवाहबंधनात अडकला आहे. धनश्री वर्मासोबत गुरुग्राममधील कर्मा लेक रिसॉर्टमध्ये चहल आणि धनश्रीचा पारंपरिक हिंदू रिवाजाप्रमाणे सोहळा पार पडला. चहलने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी युएईला रवाना होण्याआधी चहल आणि धनश्री यांचा साखरपुडा सोहळा पार पडला. धनश्री हे कोरिओग्राफर असून लॉकडाउन काळात दोघांची ओळख झाली. या ओळखीचं रुपांत प्रेमात झालं आणि चहलने धनश्रीला लग्नासाठी मागणी घातली. आयपीएलदरम्यान धनश्री चहलला पाठींबा देण्यासाठी युएईत दाखल झाली होती. हॉटेलमध्ये, मैदानावर चहल आणि धनश्रीचे रोमँटीक फोटो आतापर्यंत आपण सर्वांनी सोशल मीडियावर पाहिले आहेत.

 

आयपीएल खेळल्यानंतर चहल ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. तिकडे ३ वन-डे आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळल्यानंतर चहल भारतात परतला. गेल्या काही दिवसांपासून चहल आणि धनश्री या जोडीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होती.अखेरीस ही जोडी आज विवाहबंधनात अडकली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here