बाजारात येतोय 40 दिवस बॅटरी चालणारा दमदार फोन लॉन्च, किंमत फक्त…

Tecno-Spark-6-Go

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – भारतामधील स्मार्टफोन्सची वाढती मागणी पाहता अनेक बड्या कंपन्या बजेट स्मार्टफोन लॉन्च करत आहेत. टेक्नो कंपनीने देखील आपला नवा Tecno Spark 6 Go हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर स्टँडबाय मोडवर तब्बल 40 दिवस चालते असा दावा कंपनीने केला आहे.
Tecno Spark 6 Go हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरोजसह लॉन्च करण्यात आला आहे. निळ्या, मोरपंखी आणि चंदेरी रंगात हा फोन ग्राहकांना उपलब्ध असणार आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या एका खास ऑफरमुळे तुम्हाला 200 रुपयांचा फायदाही होऊ शकतो.

Tecno Spark 6 Go हा फोन स्टँडबाय मोडमध्ये 40 दिवस राहू शकतो आणि एकदा चार्ज केल्यावर सलग 54 तास यावर संभाषण करू शकतो असा दावा कंपनीने केला आहे. दरम्यान, फ्लिपकार्टवर या फोनची विक्री 25 डिसेंबरपासून दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. 7 जानेवारीपासून तुम्ही ऑफलाईन स्टोरमध्ये या फोनची खरेदी करू शकता. या फोनची किंमत खिशाला परवडणारी आहे. 4 GB RAM + 64 GB स्टोरेजचा हा फोन 8 हजार 6969 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here