मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – शिवसेना नंदुरबार जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन वर्षा निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले, यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, धुळे आणि नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, सहसंपर्क प्रमुख संजय उकिरडे, देवेंद्र जैन आदी मान्यवर उपस्थित होते.







