प्रहार अपंग क्रांती संघटनेचे खासदार धैर्यशील माने यांना निवेदन
इचलकरंजी (प्रतिनिधी सुनिल पाटील) – आज कोल्हापुर जिल्हातील इचलकरंजीमध्ये खासदार धैर्यशील माने एका कार्यक्रमाच्या उध्दघाटनाला आले होते यावेळी प्रहार अपंग क्रांती संघटना यांनी खासदार धैर्यशील माने यांना भेटून मागणी केली.

केंद्र सरकारने व राज्य सरकारने अपंग बांधवांची पेन्शन 5 हजार रुपये करावी व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शेकडो अपंग बांधवांना कोल्हापूर जिल्ह्यात एकाच CPR सरकारी हॉस्पिटलमध्ये अपंग सर्टिफिकेट दिले जाते आता ऑनलाईन UDID कार्डसाठी परत CPR हॉस्पिटलमध्ये oppoiment घ्यायला आणि चेक करायला असे दोन तीन वेळा जावे लागते 100%अपंग मतिमंद मुलांच्या नातेवाईकना कसा त्रास होतो हे प्रहारचे शहर अध्यक्ष सुनिल पाटील व कार्याध्यक्ष विजयनगरे यांनी मोबाईल व्हिडिओ व फोटो दाखवले आणि प्रत्येक तालुक्यातील ग्रामीणआरोग्य केंद्रात शहरात शासकीय रुग्णालयात इचलकरंजी उपजिल्हा रुग्णालयात कॅम्प घेऊन UDIDअपंग सर्टिफिकेट लवकरात लवकर द्यावेत कारण काही शासकीय कामासाठी UDID Cardची मागणी केली जात आहे आणि नगरपालिका 2021ला UDID Card असलेल्यानाच 5%निधी दिला जाईल असे सांगितले आहे, तरी आपण लक्ष घालून व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना सांगुन प्रत्येक तालुक्यातील ग्रामिण आरोग्य केंद्रात शहरात कॅम्प चालु करण्याचे आदेश द्यावेत असे निवेदन देऊन विनंती केली
यावेळी प्रहार अपंग क्रांती शहर उपाध्यक्ष इरफान बागवान, यांनी IGM हॉस्पिटलमध्ये अपंग सर्टिफिकेट देण्याची परवानगी द्यावी असे सुचवले सोबत महिला अध्यक्ष अंजना सुतार,सलीम म्हालदार,हुजरेमामु, सदाशिव गदांळे, उपस्थित होते शेवटी महाराष्ट्र राज्य शासनाने प्रत्येक महिन्यात पेन्शन देण्याची व्यवस्था करावी असे सांगितले,







