- नागरीकांच्या समस्येविषयी मनसे आक्रमक
- मनसे जनहित तालुकाध्यक्ष गणेश बेहेरेंनी विचारला न.प.प्रशासनाला जाब
- प्रभागातील नगरसेवक गायब असल्याने गटनेते जिवन चौधरी यांच्याकडे मांडले गार्हाणे.
चोपडा (प्रतिनिधी संदीप ओली) – शहरातील गुरुकुल नगर, बोरोले नगर-१-२-३, शारदा नगर, मधुबन नगर येथील राहिवासींना सोबत घेऊन मनसे जनहीत कक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश बेहेरे व प्रभागातील नागरिक यांनी नगरपालिकेचे गटनेते तथा नगरसेवक जीवन चौधरी यांच्याकडे समस्यांचा पाढा वाचला.नागरिकांना पायाभूत सुविधा मिळत नसल्याबाबत परिसरातील सर्वच नागरिकांनी आपले गाऱ्हाणे मांडत होते.
प्रभागात निवडून आलेल्या नगरसेवकांचे दर्शन मतदानानंतर झालं नसल्याचे या भागातील रहिवाशांनी व मनसे जनहीत कक्षाचे तालुका अध्यक्ष गणेश बेहेरे यांनी गटनेते जीवन चौधरी यांच्याकडे सांगितले.सोबतच लवकरात लवकर काँक्रेटचे रस्ते, गटारी,दिवाबत्तीची सोय करणे. इत्यादी कामांबाबत जीवनभाऊ चौधरी यांना बोलावून मीटिंग मध्ये समस्या सोडविण्याबाबत विनंती करण्यात आली.नियमित रहदारी असणाऱ्या गोरगावले रस्त्याची देखील अवस्था “रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ता” अशी झालेली आहे.
यासाठी मनसे जनहीत कक्षाचे तालुका अध्यक्ष गणेश बेहेरे व प्रभागातील नागरिक यांनी केलेल्या आवाहनाला मधुबन नगर, बोरोले नगर-१-२-३, शारदा नगर, गुरुकुल नगरातील सर्व रहिवासी बांधवांनी उपस्थित देत प्रतिसाद दिला.लवकरात लवकर समस्या सोडण्याबाबत गटनेते जीवन चौधरी यांनी नागरिकांना आश्वासन दिले. समस्या न सुटल्यास यापुढील काळात नगरपालिकेवर आपण मूलभूत नागरी सुविधांसाठी मोर्चा काढणार असल्याचे मनसे जनहीत कक्षाचे तालुका अध्यक्ष गणेश बेहेरे व प्रभागातील नागरिक यांनी बोलून दाखवले.







