चोपडा (प्रतिनिधी संदीप ओली) – घोडगाव ता चोपडा येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ, घोडगाव संचलित सी बी निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची इयत्ता ८ वीची विद्यार्थिनी कु हर्षदा सुनील पाटील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चोपडा तालुक्याच्या ग्रामीण भागातून सर्वप्रथम तर राज्य गुणवत्ता यादीत ग्रामीण भागातून १९९ वी आली आहे.
या यशाबद्दल कु हर्षदा व तिचे पालक सुनील पाटील यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी, उपाध्यक्ष द्रविलाल पाटील,सहसचिव भानुदास पाटील, विधी सल्लागार जवरीलाल जैन,संचालक अरूण पाटील व रामकृष्ण पाटील तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा चोपडा नगरपालिकेचे
उपनगराध्यक्ष भूपेंद्रभाई गुजराथी व नूतन शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारणी सदस्यांच्या हस्ते कौतुक व सत्कार करण्यात आला. कु हर्षदाचे शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक आर पी चौधरी, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.







