मुंबई (विशेष प्रतिनिधी सुभाष जैन) – मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन राजीव जलोटा यांच्या हस्ते 22 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता मुंबई पोर्ट ट्रस्टच्या बोर्ड रूममध्ये झाले, त्याप्रसंगी युनियनचे अध्यक्ष व अंकाचे संपादक ऍड. एस. के. शेट्येसाहेब, युनियनचे जनरल सेक्रेटरी, मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त व अंकाचे उपसंपादक सुधाकर अपराजसाहेब, युनियचे प्रसिद्धिप्रमुख व अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, युनियनचे सेक्रेटरी व अंकाचे सहसंपादक दत्ता खेसे, विजय रणदिवे व युनियनचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ज्या कामगारांना / लेखकांना / कवींना ” पोर्ट ट्रस्ट कामगार दिवाळी विशेषांक 2020 ” पाहिजे असेल, त्यांनी सोमवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवसात सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रेखा गावडे, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन, कामगार सदन, नवाब टॅंक रोड, माझगाव, मुंबई 400010. येथून अंक घेऊन जाणे. लेखक व कवींना अंक मोफत मिळेल, परंतु इतर कामगारांना जर अंक हवा असेल तर 50 रुपये द्यावे लागतील.







