अल – इरफान विद्यालयातर्फे खुलताबाद तालुका पत्रकार संघाचा सत्कार

kultabad-journalist

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – शहरातील अल – इरफान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वतीने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, खुलताबाद तालूका पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, खुलताबाद तालूका पत्रकार संघाची कार्यकर्णी नुकतीच जाहीर झाली असून या नूतन कार्यकारणी तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव व सर्व सदस्यांनाचा गुरुवारी खुलताबाद शहरातील अल-इरफान विद्यालयमध्ये सत्कार करण्यात आला.

 

al-irfan-school

अल – इरफान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मोहम्मद अझरोद्दीन, विद्यालयाचे पदाधिकारी मोहम्मद एजाज अहेमद, मॅनेजमेंट सदस्य शेख इस्माईल, सय्यद अब्दुल रहेमान, प्रा.डॉ. फिरोज यांनी पत्रकार संघाचे नवनियुक्त तालुका अध्यक्ष राजेंद्र बढे, कार्याध्य शेख जमीर, उपाध्यक्ष संतोष करपे, सचिव प्रा.सयद इरफान, कोषाध्यक्ष सलमान खान,सदस्य रमणलाल पंजाबी, विठ्ठल पाटे, शेख शरफोद्दीन यांच्यासह इतर सदस्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या वेळी अल – इरफान विद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here