नाशिक (विशेष प्रतिनिधी) – शुक्रवारी २५/१२/२०२० रोजी दुपारी २:०० वाजता तन्मय गांगुर्डे (युवा मोर्चा) च्या वतीने पद्मविभूषीत, भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जंयती निमित्त मीनाताई ठाकरे शाळा येथे अटलजींचे प्रतीमा पूजन व धान्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच दिनदर्शिका चा प्रकाशन करण्यात आले.
नाशिक भाजपा चे पदाधिकारी टार्न्सपोर्ट आघाडी चे संयोजक राजेंद्र नाना फड , मंडल अध्यक्ष अविनाश पाटील, सरचिटणीस दिनेश मोडक प्रमुख उपस्थिती त संपन्न झाला. या वेळी भूषण पगार,देवेंद्र निकम,अक्षय पवार,अमित घरटे,सागर जाधव,योगेश घरटे,श्रेयश धात्रक, इ सर्व मित्र परिवार उपस्थित होत. तसेच परिसरातील गरजू/गरीब नागरिकांना प्रत्येकी ४ किलो गहू व ४ किलो तांदूळ असे उपस्थित ५० गरजुंना वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन व संकल्पना तन्मय गांगुर्डे व भूषण पगार यांची होती.कार्यक्रमाला मदत म्हणून नारी हर्ष फाउंडेशन चे संचालिका हर्षा ताई फिरोदिया यांची मदत मिळाली व कमलेश सूर्यवंशी,भूषण पगार ,दिग्विजय पाटील,देवेंद्र निकम,प्रतिक पाटील,कुणाल जाधव,नाना बर्वे सहकार्य लाभले .







