इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू

dead body

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मालवणी येथील न्यू महाकाली भागात बांधकाम सुरू असलेल्या ‘एसआरए’च्या इमारतीवरून पडून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राजू विश्वकर्मा असे तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

राजू हा मालवणीतील बुद्धनगर परिसरात राहत होता. त्याच्या वडिलांचा भंगाराचा व्यवसाय असून त्यांच्याबरोबरच तो काम करीत होता. शुक्रवारी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून राजू खाली कोसळला. आवाज आल्याने स्थानिकांनी या इमारतीजवळ जाऊन पाहणी केली असता राजू बेशुद्धावस्थेत आढळून आला. स्थानिकांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली.

राजूला भूमीपार्क नजीकच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास मालवणी पोलीस करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here