राजगृहावरील हल्ल्याचा चोपडा भाजपाकडून तीव्र निषेध तहसीलदारांना निवेदन

चोपडा (प्रतिनिधी) – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर मधील निवास्थानात जतन करून ठेवलेल्या पुस्तका मुळे ते अनुयाईचे आदररूपी ज्ञान भांडार असलेले राजगृहावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला.
त्यात तावदानाच्या काचा सीसीटीव्ही कॅमेरे, झाडांच्या कुंड्या फोडून राजगृह परिसराची बरीच नासधूस केलेली आहे. या निषेधार्ह प्रकाराचा चोपडा भाजपातर्फे जाहीर निषेध करण्यात आलेला असून सदर प्रकारामुळे सर्व सामान्य जनतेतही तीव्र रोष निर्माण झालेला असून , शासनाने दोषींना तात्काळ शोधून काढून त्यांचेवर गंभीर स्वरूपाची कार्यवाही करावी म्हणून भारतीय जनता पार्टी तर्फे चोपडा तहसीलदार अनिल गावित यांना तालुका अध्यक्ष पंकज भाऊ पाटील, शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल, अनुसूचित जाती जमाती सेल अध्यक्ष राज घोगरे यांचे हस्ते निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनावर भारतीय जनता पार्टी चे जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, विधान सभा क्षेत्रप्रमुख प्रदीप पाटील, जिल्हापरिषद सदस्य गजेंद्र सोनवणे, कृषि उत्पन्न बाजार समिति संचालक धनंजय पाटील, औद्योगिक वसाहत चेअरमन तथा माजी शहराध्यक्ष राजु शर्मा, भाजपा युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष नरेंद्र पाटील,उपाध्यक्ष विठ्ठल पाटील,प्रवीण चौधरी, शहर सरचिटणीस मनोहर बडगुजर, सुनील सोनगिरे, चिटणीस गणेश पाटील भरतसोनगिरे , भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रकाश लक्ष्मण पाटील, शहराध्यक्ष तुषार पाठक, सरचिटणीस रितेश शिंपी, प्रसिद्धी प्रमुख यशवंत जडे, कार्यालय मंत्री मोहित भावे , आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह्या असून निवेदन सादर करताना सर्व उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here