जळगाव (संपादक सुनिल पाटील) – येथील दैनिक जनशक्तिचे मालक, मुख्य संपादक कुंदन ढाके यांचे आज (दि. २८)पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने अकाली निधन झाले.
पिंपरी-चिंचवड (पुणे) परिसरात नेहमी प्रमाणे सकाळी फिरायला गेलेले असतांना ते चक्कर येऊन खाली पडले. यावेळी हृदय विकाराचा तीव्र धक्का आला, त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. कुंदन ढाके यांचे पार्थिव भुसावळला त्यांच्या मूळ गावी आणले जाणार असून भुसावळ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
बुलंद पोलिस टाइम्स परिवार ढाके कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. बुलंद पोलिस टाइम्स परिवारातर्फे कुंदन ढाके यांना भावपूर्ण श्रद्धांजली.!







