सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष योगेश पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्याने व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहानास प्रतिसाद देवून दि. 27 डिसेंबर 2020 रोजी, छावा संघटना व शिवसंदेश ग्रुप यांच्या वतीने पारस ईस्टेट, नवी पेठ येथे मेडीकेअर ब्लड बँकेमार्फत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरांस चांगला प्रतिसाद मिळाला.
मेडीकेअर ब्लड बँकेत 132 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. विशेषता प्रथमत: रक्त देणार्या व युवक रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला. गेल्या 10 वर्षापासून योगेश पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसंदेश ग्रुप व छावा संघटनेच्या माध्यमातून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. छावा संघटनेतर्फे घेतलेल्या आजपर्यंतच्या रक्तदान शिबिरात 2011 साली 123 रक्तदान, 2012 साली 127 रक्तदान, 2013 साली 112 रक्तदान, 2014 साली 117 रक्तदान, 2015 साली 96 रक्तदान, 2016 साली 102 रक्तदान, 2017 साली 154 रक्तदान, 2018 साली 112 रक्तदान, 2019 साली 185 रक्तदान तर 2020 साली 132 असे एकूण मिळून 1260 रक्तदात्यांनी आजपर्यंत रक्तदान केलेले आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रतिकांत पाटील, संजय पारवे, गणेश मोरे, अजिनाथ परांडकर, राहुल गोयल, निशांत सावळे, बाळू लोंढे, आनंद नरळे, रवी गोयल, आरिफ शेख, विशाल पवार, सचिन गुळग, इम्रान शेख, हरी कोळेकर, धनंजय जाधव, संतोष गुंड, सागर काटकर, मनोहर गोयल, प्रविण भडंगे, ओंकार लोखंडे, गणेश घोडके, आदित्य रजपूत, शंभूराजे क्षीरसागर, प्रसाद गादेकर, लक्ष्मीकांत वन्नम, शैलेंद्र पाटील, राजू माने, विनोद पवार, प्रमोद लोखंडे, सादिक पिरजादे, उमेश पवार, संदेश लोखंडे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.







