जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संशयित रुग्णांचे तपासणीसाठी घेतलेल्या स्वॅबचा अहवाल आज (दि.११) प्राप्त झाल्यानंतर त्यात २५३ कोरोना संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान आज १६० रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत तीन हजार ३८३ रुग्णांची कोरोनापासून मुक्तता झाली आहे.
दरम्यान आज आढळलेल्या २५३ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर ६२, भुसावळ २०, अमळनेर १, चोपडा १२, पाचोरा ८, धरणगाव १, यावल २, एरंडोल ३, जामनेर ३०, जळगाव ग्रामीण १३, रावेर २१, पारोळा १२, चााळीसगाव २६, मुक्ताईनगर १९, बोदवड १२ असा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाच हजार ७२४ इतकी झाली आहे. आज ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे एकूण ३२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.







