कोरोना काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे जनसेवेचे संघकार्य कौतुकास्पद

जळगाव (विवेक खडसे)  – सद्यस्थितीत जळगाव शहर व परिसरात कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. रोज सापडणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, जिल्हा प्रशासन चिंतेत होते. शहरातील विविध परिसरांमध्ये नागरिकांच्या आरोग्य तपासणी करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध सामाजिक संस्थांना या कार्यात मदत करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते.
समाजकार्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने तात्काळ या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यास सुरुवात केली. आज जळगाव महानगरपालिका आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विद्यानगर परिसरात १८३ घरातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे. या आरोग्य तपासणीसाठी जळगाव महानगरपालिका कर्मचारी प्रकाश चौधरी, किशोर रोडे, रविंद्र अहिरे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वैभव परदेशी आणि किशोर तापडिया यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here