खुलताबाद (भागीनाथ घुसळे) – महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्यावतीने दि 10 जुले 2020 रोजी पंचायत समिती कार्यलयासमोर आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आहे. किमान वेतन ,राहणीमान भत्ता ,आशा अनेक मागण्या साठी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघचे तालुका अध्यक्ष रमेश घायटे यांच्या नेतृत्वा खाली जिल्हा अध्यक्ष घोलप याच्या मगर्दशनाखाली हे आंदोलन करण्यात आले .यातील प्रमुख् मागण्या:शासन मान्य किमानवेतन राहनीमान भत्ता मिळावा,कपात केलेली भविष्या निर्वाह निधिचि रक्कम मिळावी,पेन्शन योजना लागु करावी,सेवापट भरण्यात यावा .अशा प्रमुख मगन्याचे निवेदन गटविकास अधिकारी खुलताबाद श्री मोकाटे सर यांना देण्यात आले .यावेळी जिल्हा अध्य्क्ष भानुदास घोलप,तालुका अध्यक्ष रमेश घायटे,रामहरी आव्हाड, प्रवीण काळे,करीर पठाण,सतीश गायकवाड़,पंडित आघाडे,ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







