मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – घाटकोपर (पूर्व), कामराज नगर विभागातील सावित्रीबाई फुले महिला मंडळ स्वच्छता संवर्धन (संस्था) महासंघ येथे महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाच्या मुंबई संघटिका प्रियांका सवाखंडे यांनी थोरांचे व्यसनमुक्तीपर विचार ही पुस्तिका व माहिती पत्रक देऊन व्यसनमुक्तीवर सह्यांची मोहीम घेवून जनजागृती संदेश देणारा हा उपक्रम यावेळी संपन्न झाला. “आम्ही आजीवन व्यसनमुक्त राहु.” असा नववर्ष निमित्त संकल्प करून महिला व पुरुषांनी “नविन वर्ष धुंदीत नाही, शुद्धित राहून साजरे करू” अशा घोषणा देखील करण्यात आल्या.







