सुपरस्टार राजेश खन्ना फॅन क्लब इंडियाचे प्रमुख विलास घाटे यांच्या कडील राजेश खन्ना संग्रहाची लिम्का बुकमध्ये नोंद

vilas-ghate

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – ठाण्यातील सुपरस्टार राजेश खन्ना फॅन क्लब इंडियाचे प्रमुख आणि सुपरस्टार राजेश खन्ना यांचे जबरदस्त चाहते विलास घाटे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी 29 डिसेंबर रोजी, सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या जन्मदिनी सुपरस्टार राजेश खन्ना यांचे फॅन क्लब इंडियाची स्थापना करण्यात आली.

यावेळी नामांकित सिने पत्रकार , चित्रपट समीक्षक , लेखिका अनिता पाध्ये , उत्कर्षा मालिया , संजीव पाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सुपरस्टार राजेश खन्ना यांचे असंख्य चाहते उपस्थित होते. विलास घाटे यांच्याकडे सुपरस्टार राजेश खन्ना संबंधित माहिती संग्रह , राजेश खन्ना यांच्या सर्व चित्रपटांच्या , गीतांच्या व्हिडिओ / आॅडिओ कॅसेट , सीडी , एल पी रेकाॅर्ड , अनेक चित्रपट परिक्षणे , आणि लेखांची पेपर कात्रणं असे जे मोठे कलेक्शन आहे.

विलास घाटे ह्यांच्या सुपरस्टार राजेश खन्ना या मोठ्या संग्रहाची नोंद लिम्का बुक मध्ये झाली आहे. विलास घाटे यांना सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या असंख्य चाहत्यांनी मनःपुर्वक अभिनंदनीय हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत ‌.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here