नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि. कुबेर जाधव) – देशाअतंर्गत कांद्याची आवक वाढल्याने ,कांद्याचे भाव कमी झाले ,साधारण पणे चार महिन्या पुर्वि कांदा शंभरीकडे झुकत असतांनाच केंद्राने अचानक निर्यात बंदीचा निर्णय घेऊन कांदा उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसली ,त्यामुळे तेजित असलेल्या कांद्याचे भाव गडगडले व ते दोन अडीच हजारावर आले होते कांदा उत्पादकांच्या तिर्व व रास्त भावना लक्षात घेत ,राज्य कांदा उत्पादक संघटना ,स्वाभिमानी शेतकरी संघटना ,प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने सातत्याने स्थानिक आमदार ,खासदार यांच्या दारात जावुन साकडे घालून लक्ष वेधण्याचा सात्त्त्याने प्रयत्न केला जात होता ,मुंबईतील सत्ताधारी व विरोधक ,राज्य पालाकडे जावुन केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी राज्य कांदा उत्तपादक संघटनेकडुन प्रयत्न केले जात होते.
कांदा उत्तपादकांच्या तीर्व भावना मा ,केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या माद्यमातुन केंद्रीय कृषिमंत्री ,वानिज्य मंत्री यांचे कडे निर्यात बंदी उठवण्याची मागणी करण्यात येत होती.परंतु सात्त्त्याने कांदा उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केंद्रा कडुन केले जात होते केंद्राने कुठलीही चर्चा न करता ,शेतकरी नेत्यांना विश्वासात न घेता घाई घाईत संसदेत तिन शेतकरी विरोधी विधयक मंजूर करून घेतल्यानंतर पंजाब हरीयाना उत्तरप्रदेश मधील शेतकरी लाखोंच्या संख्येने दिल्लीला गेल्या ३० दिवसापासुन तळठोकून बसले असताना त्यांना पाठींबा देण्या साठी महाराष्ट्रातील ही हजारो शेतकरी सामील झाले ,त्यात प्रामुख्याने प्रहार शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना,राष्ट्रीय किसान मोर्चा याचा समावेश आहे.
राज्य मंत्री बच्चू भाऊ कडू मा ,खा.राजु शेट्टी ,डॉ अजित नवले रविकांत तुपकर ,संदीप गीडे ,इंजि शंकर दरेकर ,यशवंत गोसावी ,यांनी महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या समस्या मांडत कांद्यावर लादलेल्या निर्यात बंदी मुळे कांद्याचे भाव सात्त्त्याने खाली येत आहेत ही गोष्ट लाखो आंदोलकांसमोर मांडुन लक्षवेधून घेतले त्यामुळे उशिरा का होईना केंद्र सरकार ला जाग आली व त्यांनी निर्यात खुली केली ,दिंडोरी मतदार संघातील खासदार डॉ भारती पवार यांनी सातत्याने केंद्रीय कृषिमंत्री वानिज्य मंत्री यांच्या कडे पाठपुरावा केल्या मुळे केंद्राला निर्यात बंदी उठव्हावी लागली ,भविष्यात कायम कांदा निर्यात सुरु ठेऊन उत्पादकांना दिलासा द्यावा अशी मागणी कांदा उत्पादक संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव यांनी केली आहे.







