सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांना ड्रेस किट वाटप

nagar-safety-kit-distribution

अहमदनगर (प्रतिनिधी कृष्णा साठे) – महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघाने वारंवार केलेल्या प्रयत्नाला अखेर यश मिळाले आहे.अहमदनगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांना मंडळाच्या नियमानुसार दोन वर्षानतर ड्रेस मिळतो व त्या ड्रेसची मागणी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघाकडून सहाय्य्क कामगार आयुक्त तथा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत व मंडळाचे निरीक्षक श्री. देवकर यांना निवेदन देऊन मागणी केली होती.

त्यानुसार आज मांडळामध्ये ड्रेस किट चे वाटप करण्यात आले त्यावेळेस सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष -श्री. राऊत, मंडळाचे निरीक्षक श्री. देवकर, लेखापाल श्री. बनकर व महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघाचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा साठे व आदी पदाधिकारी व मंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here