नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट दोघे जयपूरमध्ये पोहोचले आहेत. विमानळावर जातानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. दोघांचा आज साखरपुडा असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
सोशल मीडियावर या स्टार्सचे फोटो आणि व्हिडिओ पाहून रणबीर कपूर -आलिया भट्ट जयपूरमध्ये लग्न करणार आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे. ताज्या माहितीनुसार, रणबीर-आलिया हे दोघेजण रणथंबोरमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहदेखील आज जयपूरमध्ये आहेत.
रणबीर कपूर-आलिया भट्ट, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह यांना विमानतळावर स्पॉट करण्यात आले. तेव्हा सर्वांना वाटलं की, हे लोक न्यू ईअर व्हेकेशनसाठी गेले आहेत. परंतु, आता सर्वांना एकत्र जयपूरमध्ये पाहण्यात आले. तेव्हा सोशल मीडियावर साखरपुड्याची चर्चा सुरू झाली. तर, दुसरीकडे ‘ब्रह्मास्त्र’च्या चित्रपटासाठी ते रणथंबोरमध्ये गेल्याची चर्चा सुरू आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रणबीर – आलियासोबत रणबीरची आई नीतू कपूर, बहिण रिद्धिमा आणि तिची मुलगी समारादेखील सोबत होत्या. त्याआधी दीपिका-रणवीर सिंहलादेखील कलिना विमानतळावर पाहण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत आलियाची आई सोनी राजदान आणि बहिण शाहीन भट्टदेखील असल्याचे वृत्त समोर आले आहे.







