महाराष्ट्रात ३१ जानेवारीपर्यंत निर्बंध कायम – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

udhav-thakare

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – कोरोनाचं संकट वर्षभर ओढावलं आहे. कोरोना काळानंतर काही नियम शिथिल करण्यात आले. आवश्यक ती खबरदारी लक्षात घेऊन पुन्हा स्थिरस्थावर होण्यासाठी प्रयत्न सुरू राहिले. परंतु, अद्याप कोरोनाचे संकट कमी झालेले नाही. भारतातही मंगळवारी करोनाच्या नव्या विषाणूंची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यात ३१ जानेवारीपर्यंत मिशन बिगीन अगेन लागू राहील, असे ठाकरे सरकारने जाहीर केले आहे.

maharashtra-shasan
राज्य सरकारकडून अधिकृत आदेश काढण्यात आला आहे. यामध्ये नव्या वर्षातील ३१ जानेवारीपर्यंत हे निर्बंध लागू राहतील, असे म्हटले आहे. कोरोनाचे संकट अद्याप संपलेलं नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घतल्याचे आदेशात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here