दादर मुंबई – (विशेष प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) – अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन प्रबोधन समितीतर्फे दिला जाणार राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार ॲड. प्रिया प्रविणकुमार शहा यांना सामाजिक श्रेत्रांतून जाहिर झाला आहे 2 जानेवारीला मा.कृषीमंत्री दादाजी भुसे व मा.संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांचेकडून मराठा दरबार मालेगाव येथे गौरविण्यात येणार आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन समितीतर्फे दिला जाणारा मानाचा राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार राज्यातील सामाजिक व राष्ट्रीय कामात उच्च काम करणाऱ्या 25 व्यक्ती व संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती अंधश्रद्धा निर्मुलन व वैज्ञानिक दृष्टिकोन समितीचे राज्याध्यक्ष तानाजी शिंदे यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.ॲड. प्रिया प्रविणकुमार शहा यांचे सर्व स्तरावर स्वागत व अभिनंदन होत आहे.







