सौ.अनिता पाटील यांचा खाटीक परिवाराकडून हृद्य सन्मान !

सांगली (स्वप्निल कारेकर) – राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नुतन जिल्हा उपाध्यक्षा उच्च विद्याविभूषीत अभियंता सौ. अनिता विजय पाटील यांनी आज सदिच्छा भेट देवून अनौपचारीक गप्पा गोष्टी केल्या .
सौ .अनिता पाटील (M.E.Structure) आपले उच्चशिक्षित अभियंता पति विजय सखाराम पाटील (M.E. structure) यांच्या समवेत खाटीक यांच्या निवासस्थानी आल्या . खाटीक परिवाराचे वतीने सौ . राबीयॉबसरी सादिक खाटीक यांनी अनिताताईचा राष्ट्रवादी महिला काँगेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार केला .
तळागाळातल्या सर्व सामान्य माता, भगिनी ,युवक, युवती ,विद्यार्थी याबरोबरच कष्टकरी शेतकऱ्यांसाठी सतत कार्यरत रहा, वेगवेगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याबरोबरच नव नवीन संकल्पना राबवीत काम करा . चांगल्या कामाची,निस्वार्थ कष्टाची आणि लढवय्या वृत्तीची दखल राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आणि महाराष्ट्राचे नेते ना . जयंतराव पाटील साहेब निश्चित घेतील . चांगल्याची कदर करणाऱ्या या नेत्यांनी आणि पक्षाने नेहमीच प्रामाणीकपणे कार्यरत राहणाऱ्या प्रत्येकाचा गौरव केला असल्याची भावना सादिक खाटीक यांनी यावेळी अभिमानपूर्वक व्यक्त केली .
यावेळी अभियंता विजय पाटील , सौ .रशिदाबी महंमद शेख ,श्रीमती रशिदाबी पापामियाँ खाटीक , राष्ट्रवादी सोशल मिडीया सेलचे आटपाडी तालुका अध्यक्ष कुर्बानहुसेन सादिक खाटीक हे उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here