कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – औरंगाबाद येथील संभाजीनगर येथे झालेल्या महिलेवरील अात्याचार विरोधात राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना त्वरित अटक करावी व त्यांना कठोरात कठोर शिक्षा सुनावण्यात यावी महाराष्ट्रात वाढलेले बलात्काराचे प्रकार निंदनीय व घृणास्पद आहेत या वाढत्या प्रकरणांचा परिपाक म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत आज कोल्हापूर महानगर युवा मोर्चाने रास्ता रोको व निषेध आंदोलन गंगावेश चौकात केले.
यावेळी उपस्थित युवा मोर्चा अध्यक्ष विजयसिंह खाडे पाटील यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली तसेच युवती आघाडी अध्यक्ष मयुरी पोवाळकर व महिला आघाडी अध्यक्ष गायत्री राऊत यांनी नोकरीचे आमिष देत महिलेचा महिलेवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारास कशाचीही तमा न बाळगता त्वरित शासन व्हावे अशी मागणी केली तर युवा मोर्चा संघटन सरचिटणीस विवेक सुभाष वोरा यांनी शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये स्त्री जातीवर केला जाणारा हा अत्याचार आम्ही कधीच सहन करणार नाही अशा विकृत लोकांना पाठीशी करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही तसेच महिलांवरील अत्याचारांचे वाढणारे प्रमाण पाहता लवकरच या सर्वांचा नायनाट करण्यासाठी जनतेला पावले उचलण्याची गरज पडणार आहे असे मत व्यक्त करत मुख्यमंत्री गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस चा निषेध व्यक्त केला.
यावेळी विजय खाडे पाटील भाजयुमो जिल्हाध्यक्ष कोल्हापूर महानगर , विराज चिखलीकर भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य, प्रसाद मोहिते भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य, गायत्री राऊत भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कोल्हापूर महानगर, विवेक वोरा भाजयुमो जिल्हा सरचिणीस कोल्हापूर महानगर, गिरीश साळोखे भाजयुमो जिल्हा सरचिणीस कोल्हापूर महानगर,वल्लभ देसाई, प्रदीप घाटगे, विश्वजीत पवार, सुनिल पाटील, विवेक राजवर्धन, अमित माळी, मयुर कदम, निलेश आजगावकर, प्रेम काशीद, रोहित कारंडे, सिध्दांत भेंडवडे, सचिन मुधाळे, नाजीम आत्तार, शाहरुख गडवाले, रजत इंगवले, निरंजन घाटगे, वैशाली खाडे पाटील, मयुरी पोवळकर,आसावरी जुगदार, सुनिता सूर्यवंशी,श्वेता कुलकर्णी, शोभा कोळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.







