सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी ३१ व्या वेळी रक्तदानाचे कर्तव्य बजावून २०२० या सरत्या वर्षाला दिला निरोप !

hivare-blood-donation

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – जोगेश्वरी पूर्व येथील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, वृत्तपत्रलेखक, पत्रकार व जॉय ऑफ गिविंग चे संस्थापक गणेश हिरवे सर यांनी २०२० या वर्षीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर २०२० ला ३१ व्या वेळी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपत थर्टीफर्स्ट एका वेळग्या पद्धतीने साजरा कसा करता येईल याचे उत्तम उदाहरण दाखवून दिले.

 

ganesh-hivare आजकाल थर्टीफस्ट लोक अनेक प्रकारे साजरा करीत असतात,पण हा दिवस एका वेगळ्या कारणाने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करून साजरा करण्याचं भाग्य मला मिळाले अशी भावना हिरवे सरांनी बोलून दाखविली. तरुणाईने गणेश हिरवे सर यांचा आदर्श समोर ठेवून जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करावे. विशेषत: याआधी देखील अनेक सामाजिक उपक्रम व कामे स्वतः सरांनी अग्रेसर राहून पदरमोड करत , तसेच आपल्या जॉय संस्थेच्या माध्यमातून केली आहेत.

एक गुणी व्यक्तिमत्त्व म्हणून सरांना सर्वजण मुंबई व महाराष्ट्रात ओळखतात. लॉकडाउन काळातही हजारो गरजू, गोर-गरीब व वंचित कुटुंबीयांना किराणा समान,आरोग्य व स्वच्छता किट, मास्क, अल्पोपहार , सॅनिटायझर व इतर अनेक जीवनावश्यक वस्तू वितरण केल्या आहेत , त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल दिल्ली व महाराष्ट्रतील अनेक सामाजिक संस्थानी घेऊन त्यांना जवळपास ६३ कोविड योध्दा सन्मानपत्र देऊन गौरव केला. गणेश हिरवे सर अनेक संस्था व मंडळांवर सल्लागार व मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. यापुढेही आपण करीत असलेलं हे सामाजिक काम असच सुरू राहणार असल्याचे मनोगत गणेश हिरवे यांनी यानिमित्ताने व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here