अलिबाग – सोगावकर – स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 4 हजार 118 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 384 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1364, पनवेल ग्रामीण-409, उरण-176, खालापूर-225, कर्जत-94, पेण-242, अलिबाग-181, मुरुड-48, माणगाव-54, तळा-4, रोहा-75, श्रीवर्धन-41, म्हसळा-44, महाड-39, पोलादपूर-13 अशी एकूण 3 हजार 09 झाली आहे.
कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-2 हजार 222, पनवेल ग्रामीण-714, उरण-282, खालापूर-46, कर्जत-137, पेण-116, अलिबाग-140, मुरुड-24, माणगाव-107, तळा-15, रोहा-163, सुधागड-7, श्रीवर्धन-27, म्हसळा-32, महाड-54, पोलादपूर-32 अशी एकूण 4 हजार 118 आहे.
आज दिवसभरातही पनवेल मनपा-119, पनवेल ग्रामीण-38, उरण-8, कर्जत-10, पेण-5, अलिबाग-7, माणगाव-4, रोहा-17, श्रीवर्धन-5, महाड-1 असे एकूण 214 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
आतापर्यंत पनवेल मनपा-94, पनवेल ग्रामीण-30, उरण-10, खालापूर-10, कर्जत-10, पेण-10, अलिबाग-9, मुरुड-6, माणगाव-2, तळा-2, रोहा-2, सुधागाड-1, श्रीवर्धन-3, म्हसळा-5, महाड-9, पोलादपूर-2 असे एकूण 205 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-169, पनवेल (ग्रा)-54, उरण-30, खालापूर-28, कर्जत-15, पेण-38, अलिबाग-18, मुरुड-12, तळा-1, रोहा-6,श्रीवर्धन-1, महाड-2, पोलादपूर-10 अशा प्रकारे एकूण 384 ने वाढ झाली आहे.
आजच्या दिवसात 5 व्यक्तींची (पनवेल मनपा-2, कर्जत-1, अलिबाग-1, मुरुड-1) मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातून 25 हजार 816 नागरिकांचे SWAB कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 122 आहे.







