जळगाव कोविड केअरतर्फे गावोगावी व वार्डा वार्डात जाऊन तपासणीसह मोफत औषधोपचार

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – महाराष्ट्रात नव्हे तर भारतातील एकमेव अल्पसंख्यांक समाजातील ३३ संघटनांनी एकत्रित येऊन जळगाव कोविड केअर युनिट ची स्थापना केली व त्याद्वारे ५६ अल्पसंख्यांक डॉक्टरांच्या माध्यमाने जळगाव शहरातल्या वार्डा वार्डात जाऊन तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात ज्या ठिकाणी कोरोणाचे संसर्ग रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहे अशा ठिकाणी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण व वैद्यकीय तपासणी करून औषधोपचार देणारी ही एकमेव संघटना ठरली असून आज पर्यंत जळगाव शहरातील १० वार्डात व ग्रामीण भागातील पाळधी, नशिराबाद, चोपडा, नाचणखेडा व अडावद येथे प्रत्यक्ष जाऊन सुमारे ५८ हजार ३१२ लोकांचे सर्वेक्षण करून १० हजार १७७ लोकांची तपासणी करून त्यांना औषधोपचार देण्यात आले.
अडावद येथे शनिवारी झालेल्या सर्वेक्षण व वैद्यकीय शिबिराचे उद्घाटन सरपंच भावनाताई माळी व सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले. या वेळी गावचे उपसरपंच अमीन मन्यार, आरोग्य अधिकारी डॉक्टर दायमा, ग्राम पंचायत सदस्य जावेद खान हमीद खान, भारतीताई महाजन, अल्ताफ खान ताहेर खान, यासह कोविड केअर युनिट चे प्रमुख प्रमुख मुफ्ती अतिकउर रहेमान, अध्यक्ष गफ्फार मलिक, जनसंपर्क प्रमुख फारुक शेख ,डॉक्टर जावेद शेख, आदींची उपस्थिती होती.
व्यासपीठावर अडावद चे रियाज अली सय्यद ,हाजी अब्दुल रहमान खान कुरेशी, हाजी कबीरोद्दीन दिलफिरोज, हाजी जहिरोद्दीन शेख हशम, फरीद मेम्बर ,हाजी अब्दुल रज्जाक मन्यार, व दिनू दादा देशमुख उत्पन्न बाजार समिती अडावद चे संचालक यांची उपस्थिती होती.
डॉक्टर जावेद,रियाज बागवान, तौफिक शेख ,आसीम खान, अब्दुल रहीम शेख, वसी अहमद, वसीम कुरेशी ,जाकीर खान, अब्दुल वहाब, कामिल शेख, अमजद खान, वकार शेख, जावेद मुशीर खान, सौ जहाआरा शेख,सौ जीनत अमजद खान,सौ गजा शफिकपूर रहमान ,मुदस्सर शेख ,अन्सार सिद्दिकी, रिजवान खाटीक या डॉक्टरांनी सेवा दिली.
कोविड केअर सेंटर तर्फे या पंधरा वैद्यकीय शिबिरात सुमारे दोन लाख रुपयाचे औषध उपचार मोफत रुग्णांना दिले असून सर्वात महत्त्वाचे रुग्ण व त्याच्या नातेवाईक व इतरांवर समुपदेश करून त्यांच्या मनातील भीती काढण्यात आली एवढेच नव्हे तर प्रत्येक वॉर्डातील व ग्रामीण भागातील जनरल प्रॅक्टिशनर यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना विनंती करून की आपण आपल्या भागात आपला दवाखाना सुरू ठेवा व आपण रुग्णांची सेवा करा असे आव्हान केल्यामुळे निश्चितच त्याचा फायदा हा त्या भागातील लोकांना झाला व कोरोना ची भीती मनातून निघाली त्यामुळे निश्चितच या पंधरा सर्वेक्षण व कॅम्प चे ठिकाण बघितले असता त्या ठिकाणी कोरोना ची आकडेवारी अत्यंत कमी प्रमाणात झालेली आहे.
हाजी जाहिरोद्दीन,अर्षद अली,रेहान मलिक,जमीर शेख,याकूब सेठ,शाफिक एम आर,पप्पू तडवी,सचिन महाजन,अमजद खान,अमजद सिमेंट,अफसर केला ,अमीन रजा,अब्दुल रझझ्याक,झिया उल हक, जावेद खान,शब्बीर शेख,अल्ताफ मेंबर,ताहेर मेंबर,इम्रान खान,रियाज मिस्त्री,हाजी हबीबोद्दीन,मोमीन एजाज,सादिक शेख,इम्रान शेख,इम्रान खान,सलीम किराणा यांनी सहकार्य केले.
आमिर शेख,अर्षद शेख,इब्राहिम पिरजाडे,जफर शेख, अतिक शेख,हमजा शेख,हुजेफा शेख,मुशाहीद मानियार,फैझान अय्युब,फैझान शेख, अनिस शाह,झाकीर शेख,जुलकर नैन,अल्ताफ अलहिंद यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here