‘कबीर सिंग’ फेम वनिता खरातचे न्यूड फोटो व्हायरल

kabirsingh-vanita-kharat

मुंबई (चित्रपटविभाग प्रतिनिधी गणेश तळेकर) – आज नव्या वर्षाची सुरूवात झाली असून अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देत आहे. यामध्ये सेलिब्रेटीदेखील मागे नाहीत. दरम्यान, ‘कबीर सिंग’ अभिनेत्री वनिता खरातने वर्षाच्या पहिल्याच दिवशी बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तिचा हा बोल्ड अंदाज पाहुन चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

वनिता खरातने शेअर केलेला हा बोल्ड फोटो फक्त शाब्दिकरित्या बोल्ड नसून तो वैचारिकदृष्ट्याही बोल्ड आहे. आपल्या वजनाचा न्यूनगंड कुठेही न बाळतगता वनिता खरातने हा फोटो शेअर केला आहे. ,’मला माझ्या प्रतिभेचा अभिमान आहे. माझी आवड, माझा आत्मविश्वास, मला माझ्या शरीरावर अभिमान आहे… कारण मी मी आहे…!!! अशा आशयाची पोस्ट शेअर करत वनिताने न्यूड फोटो शेअर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वनिताने हे फोटोशुट एका कॅलेंडरसाठी केल्याचे समजते. कारण वनिताच्या फोटोसोबत नवीन वर्षातील जानेवारी महिन्याचं कॅलेंडर असल्याचं कळतंय. वनिता खरातचं हे फोटोशूट फोटोग्राफर तेजस नेरुरकर यांनी केलं आहे. #BodyPositivity असा हॅशटॅग वापरत वनिताने हा फोटो शेअर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here