शिवसेनेचा निराधार महिलेबरोबर नाताळ उत्सव

vasai-natal

मुंबई (विशेष प्रतिनिधी जगदीश काशीकर) – वसई तालुक्यात नाताळ सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जात असताना मनवेलपाडा येथे राहणारी एक निराधार महिला ऐलेस शेलेट आँटी जिचे स्व:ताचे असे कोणीच नाही व तिने मागील 02 वर्षापुर्वी शिवसैनिकांकडे तिच्या बरोबर ख्रिसमस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली असल्यापासुन दर वर्षी शिवसेना विरार उपशहरप्रमुख उदय अ.जाधव यांच्या शिवसेना “मातोश्री” जनसंपर्क कार्यालय येथे बोलवुन दरवर्षी ख्रिसमस केक त्या आँटीच्या हस्ते कापून तिला शुुभेच्छा देऊन नाताळ सणाचा आनंद त्या निराधार महिलेला मिळावा म्हणून जाती पातीचा कोणताही भेदभाव न करता विरार शहरात नाताळ सण साजरा केला जातोय.

यावेळी शिवसेना विभागप्रमुख प्रविण आयरे , उपविभागप्रमुख संतोष राणे, सुनिल चव्हाण, शाखाप्रमुख तुकाराम भुवड, चंद्रकांत सावंत, गणेश जाधव, उपशाखाप्रमुख दिनेश खळे, महिला आघाडीच्या प्रमुख सौ. रोशनी रा. जाधव, सौ.साक्षी उ. जाधव तसेच युवा सेनेचे रोहित कदम, सागर नाचरे, सुनिल घाडी आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here