खुलताबाद काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त सत्कार

abdul-sttar

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – महाराष्ट्र राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना विविध पक्ष, संघटना, तसेच समर्थकांकडून त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला.

याप्रसंगी खुलताबाद काँग्रेस कमिटीच्या वतीने देखील अब्दुल सत्तार यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे कोरोना साथ रोगाच्या अनुषंगाने नियमांचे पालन करीत अत्यंत साध्या पद्धतीने अब्दुल सत्तार यांनी शुभेच्छाचा स्विकार केल्या.

राजकारण करत असताना थोरा मोठ्यांचे आशीर्वाद, मित्रजनांचे सहकार्य तसेच कार्यकर्ते व समर्थकांनी दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी कायम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अब्दुल सत्तार यांनी सत्काराला उत्तर देतांना केले. यावेळी माजी नगराध्यक्ष सलीम कुरैशी,खुलताबाद शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अब्दुल समद टेलर,शहर काँग्रेस उपाध्यक्ष शेख इकरामोद्दीन,अमीनोद्दीन टेलर आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here