खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर विशेष मोहीम राबवून वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या बेशिस्त वाहनचालकावर मोटार वाहन कायद्याखाली इ चलन द्वारे केसेस करण्यात येऊन त्यांना हेल्मेट विषयी व सीटबेल्ट बाबत प्रबोधन करून वाहतूक नियमाचे पालन न करणार्या वाहनचालकाकडून सुमारे एक लाख सहा हजार रुपये दंड ई चलन द्वारे वसूल करण्यात आला.
यावेळी रस्ता सुरक्षा बाबत ट्रक चालकांची सुद्धा जनजागृती करण्यात आली. सर्व वाहन चालकांना मार्गदर्शन करून खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या.यामध्ये महामार्गावर ट्रक चालवीताना डाव्याबाजूने लेफ्ट लेनने ट्रक चालवावी, दारू अथवा कोणत्याही अंमली पदार्थाचे सेवन करून वाहने चालवू नये,रात्री अपरात्रीचे वेळी वाहने रस्त्याचे कडेला पार्क करू नये त्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाहन चालविताना वाहनाचा वेग कमी असावा अति वेगाने वाहने चालवु नये, कोरोनाचा आजही मोठया प्रमाणात प्रादुर्भाव असल्याने मास्कचा वापर करावा आपली सुरक्षा आपल्या हाती याबाबत देखील सूचना देण्यात आल्या आहेत, वाहन चालविताना मोबाईल फोनवर बोलू नये, हेल्मेट चा वापर करावा. दुचाकीवर दोन पेक्षा अधिक इसम बसवू नये, वाहन चालविताना सीटबेल्टचा वापर करावा इत्यादी बाबत सूचना देण्यात आल्या.
ही कारवाई डॉ भूषण कुमार उपाध्याय अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक मुंबई, पोलीस अधीक्षक संजय जाधव प्रादेशिक विभाग पुणे, प्रीतम यावलकर उप विभागीय पोलीस अधिकारी पुणे, पोलीस निरीक्षक नंदिनी चांनपूरकर औरंगाबाद विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक सुरेश भाले,साह पोलीस उप निरीक्षक रामदास वाघ, पोलीस हवलंदार सईद जाफर,बाबुराव जाधव, अभिजित गायकवाड, अमर अलनजकर,दीपेश शिरोडकर, शरद दळवी, शांताराम सोनवणे यांनी महामार्गावर केली.







