संघाच्या सभासदांचा विशेष गौरव मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येणार
मुंबई (विशेष प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) – मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने ६ जानेवारी २०२१ रोजी संध्याकाळी ५.३० वा दादर सार्वजनिक वाचनालय, धुरू हॉल, दादर-पश्चिम येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक कोरोना महामारीच्या विरोधात जनजागृती व्हावी याहेतूने त्या विषयावर लेखन केलेल्या संघाच्या सभासदांचा विशेष गौरव मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. आरोग्य खात्याशी आणि जनतेशी सातत्याने संपर्कात असणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार संतोष आंधळे आणि डॉ कुशल केळशीकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या खबरदारीच्या हेतूने अटी व नियमांचे पालन करून हा सावधपणे हा कार्यक्रम होणार असल्याने ज्या सभासदांना उपस्थित राहावयाचे असेल त्यांनी तात्काळ येणार असल्याची नोंद रमेश सांगळे ९८२१५७४८९१ यांच्या व्हाट्सअप वर द्यावी ही विनंती.अशी माहिती रवींद्र मालुसरे (अध्यक्ष) प्रशांत घाडीगावकर (प्रमुख कार्यवाह), रमेश सांगळे (कार्याध्यक्ष) आत्माराम गायकवाड (कोषाध्यक्ष) नितीन कदम (सहकार्यवाह) आणि कार्यकारी सदस्य यांनी सांगितली.







