प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे रायगड जिल्हा युवाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर यांचा कुलाबा जीवन गौरव पुरस्कारांने सन्मान

shrikant-nadgaonkar

माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

रायगड (विशेष प्रतिनिधी) – आमदार भाईजगताप मित्र मंडळ रायगड व मधूशेठ ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या तर्फे सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय व पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार अलिबाग चेंढरे येथील भाग्यलक्ष्मी हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.

यंदाचा पत्रकारिता क्षेत्रातील कुलाबा जीवन गौरव (२०२१) पुरस्कार प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे रायगड जिल्हा युवाध्यक्ष श्रीकांत दत्तात्रेय नांदगावकर यांना माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.पत्रकार श्रीकांत नांदगावकर यांनी कोरोना व लॉकडाऊन काळात आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेपर्यंत प्रत्येक घडामोडी पोहचविण्याचे प्रामाणिक कार्य केले तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना कुलाबा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी व्यासपीठावर आमदार भाई जगताप अध्यक्ष मुंबई काँग्रेस, अॅड.उमेश ठाकूर, अॅड. प्रविण ठाकूर तसेच मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकांत नांदगावकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, क्राईम विभागाध्यक्ष नफीस शेख, चित्रपट विभागाध्यक्ष प्रशांत विलणकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते-पाटील, राज्य महिलाध्यक्षा डाॅ.सुधाताई कांबळे, राज्य महिला संघटक रिध्दी बत्रा, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ आडसूळ, अशोक इंगवले, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनिष नेरूरकर, किरण बाथम, युवा प्रदेशाध्यक्ष सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, युवा महिलाध्यक्षा किरण जाधव, विदर्भ अध्यक्ष विजय बुंदेला, महिलाध्यक्षा सविता चंद्रे, कोकण विभागाध्यक्ष जयप्रकाश पवार, महिलाध्यक्षा ज्योती चिंदरकर, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, मराठवाडा कार्याध्यक्ष हुकुमत मुलाणी, मराठवाडा संपर्क प्रमुख सुर्यकांत तादलापूरकर, उत्तर महाराष्ट्र विभागाध्यक्ष नवनाथ गायकर, संपर्क प्रमुख युवराज देवरे, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी शशिकांत पोरे, महिलाध्यक्षा उषाताई लोखंडे, कोकण सरचिटणीस महेश महाजन, पंडित फंगाळ, कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. रत्नाकर पाटील, महिला जिल्हाध्यक्षा दिपीकाताई चिपळूणकर, जिल्हा संघटक हरिश्चंद्र महाडिक, जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्र्यय दळवी सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी व सभासदांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here