कणकवली- (विशेष प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) – गेली २५वर्ष राजकारण व समाजकारणात सक्रीय असणा-या कणकवली नगरपंचायतीच्या माजी नगरसेविका सौ.राजश्री धुमाळे यांच्या उज्वल राजकीय कारकीर्दीची व समाजकार्याची दखल घेऊन नुकताच त्यांना जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र या सामाजिक संस्थेकडुन सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.राजश्री धुमाळे या पाच टर्म जिल्हा परिषद सदस्या म्हणुन कार्यरत होत्या.तसेच दोन वेळा नगरसेविका म्हणुन कणकवली नगरपंचायतीमध्ये कार्यरत होत्या.महिला बाल कल्याण समितीचा कार्यभार संभाळला होता.सध्या त्या कणकवली पोलिस स्टेशनच्या महिला सदस्या म्हणुन कार्यरत आहेत. राजश्री धुमाळे या चौंडेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा,कोष्टी समाज सेवा सिंधुदुर्ग च्या सदस्या,तसेच महाराष्ट्र राज्य कोष्टी महासंघाच्या सदस्या म्हणुन कार्यरत आहेत.तसेच राजश्री धुमाळे या सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा उपाध्यक्षा म्हणुन कार्यरत आहेत.त्यांच्या या चतुरस्त्र कार्याची दखल घेऊन त्यांना जनजागृती सेवा समितीच्यावतीने सन्मानित करण्यात आले.त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर दिली.







