मॉसाहेब स्व.मीनाताई ठाकरे जयंतीनिमित्त शिरपूर शिवसेनेतर्फे अभिवादन

minatai-thakre-jayanti

शिरपूर (प्रतिनिधी) – येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आज बुधवार रोजी स्व.मीनाताई ठाकरे यांची 87 वी जयंती निमित्त स्व.मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन ममता दिन साजरा करण्यात आला. तसेच मॉसाहेब यांच्या जयंतीनिमित्त गरीब गरजु मुलांना स्वेटर वाटप व ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी माँसाहेब स्व.मीनाताई ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

 

शिवसेनेतर्फे मॉसाहेब स्व. मीनाताई ठाकरे यांचा जयंतीदिवस हा ममता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून शिरपूर शिवसेनेतर्फे गरीब गरजु मुला-मुलींना स्वेटर जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. स्वेटर वाटप कार्यक्रम ज्ञानदीप क्लासेसचे संचालक जितेंद्र पाटील व अर्चना पाटील यांच्या सौजन्याने करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत निवडणूकीत बिनविरोध निवडून आलेले शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुनिता अत्तरसिंग पावरा (हिंगोणीपाडा), सुमित्रा सुरजसिंग पावरा (हिंगोणीपाडा), सुरेखा विजय पावरा (नटवाडे), सोऱ्याबाई जबरसिंग पावरा (नटवाडे), विमलबाई दिपकसिंग राजपूत (बोरगांव) या सर्वांचा सत्कार जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या हस्ते करण्यात आला.

shirpur-shivsena

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, उपजिल्हाप्रमुख भरत राजपूत, शिंदखेडा जिल्हा संघटक भाईदास पाटील, धुळे उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराना, एसटी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजु टेलर, तालुकाप्रमुख दिपक चोरमले, अत्तरसिंग पावरा, महिला आघाडी वीणाताई देशपांडे, अर्चना देसले, लक्ष्मी कोकणी, पिंकी पावरा, बंटी लांडगे, योगेश ठाकरे, प्रेमकुमार चौधरी, बंडू सोनार, पिंटू शिंदे, सुनील सुर्यवंशी, विजय पावरा, अनिकेत बोरसे, मसुद शेख, बबलू शेख, तुषार महाले, जितेंद्र पाटील, विजय पवार, अशोक जाधव, देवाजी पाटील, दिनेश गुरव, रोहिदास पावरा, अजित पावरा, राकेश पावरा, राजाराम पवार, विजय पावरा आदी उपस्थित होते.

shivsena-shirpur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here