रतन टाटा यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोरोना वॉरियर पुरस्कार सोहळा संपन्न!

ratan-tata-purskar

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – रतन टाटा जी यांच्या 83 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मॅनेजिंग इंडिया मीडिया लिंकचे संचालक , सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार के. रवी (दादा), ज्यांना (ब्रदर्स टेरेसा) म्हणून ओळखले जाते, त्यांनी प्रख्यात उद्यमी विजय कलंत्री आणि सर्व धर्म शिक्षा संभाणावर विश्वास ठेवणारे उद्योजक टिम्मी मेहता यांच्या उपस्थितीत डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, मुंबई मनपाचे अधिकारी , कर्मचारी उद्योजक आणि कलाकारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोरोना वॉरियर्स पुरस्कार देऊन सन्मानित केले

इंडिया मीडिया लिंक हे असे एक इव्हेंट मॅनेजमेंट आहे जे नाव सातत्याने समाजसेवेत नेहमीच अग्रेसर राहिले . इंडिया मीडिया लिंक आणि इव्हेंट मॅनेजमेंटने मागील वर्षी रतन टाटा जींचा वाढदिवस कर्करोगाने ग्रस्त लोकांची सेवा करून साजरा केला होता. आता या वर्षी देखील हा कार्यक्रम के. रवी ( दादांच्या ) माध्यमातून गरीब अपंगांना सन्माननीय करून साजरा केला गेला.

याप्रसंगी देशाचे उद्योजक रतन टाटा यांचे सुंदर कटआउट लावून सेल्फी पाँईंट के. रवि ( दादा )नी तयार केले , ज्याचे उद्घाटन आदरणीय विजय कलंत्री यांच्या हस्ते झाले. ज्यांच्या हस्ते रतन टाटा जी यांच्या वाढदिवसाचा केकही कापण्यात आला. याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक टिम्मी मेहता जी यांना प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार कोरोना योद्धा म्हणून विजय कलंत्रीजी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यासह, अनेक शासकीय पुरस्कार प्राप्त झालेल्या मेडस्केप इंडियाची डॉ. सुनीता दुबे यांनाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवर्ड ने गौरविण्यात आले. ज्याच्या 2 हजार डॉक्टरांच्या टीमने कोरोना कालावधीमध्ये रात्रंदिवस काम केले. यावेळी विजय कलंत्री म्हणाले की, पहिल्यांदाच मी देशाच्या प्रसिद्ध चांगल्या उद्योजकाच्या वाढदिवसाचा असा अनोखा सामाजिक कार्यक्रम पाहत आहे. ज्याचे मी कौतुक करतो आणि या कार्यक्रमाबद्दल मी रतन टाटा जीना देखील सांगेन.

मुंबई मनपाचे अभियंता जीवन पाटील आणि त्यांच्या टीमला कोरोना योद्धा म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. तसेच अशोक खैरे नावाच्या तरूणाने स्वत: गरीब असूनही लोकांना रेशन वाटून 4 महिने दिवस-रात्र सेवा केली. तसेच नगरसेवक . सुफियान निआज अहमद वनू, माजी नगरसेविका लक्ष्मी जाधव, डॉ. आर. रामकृष्णन यांनाही कोरोना योद्धा म्हणूनही सन्मानित करण्यात आले. एकूण 11 जणांना रतन टाटा जी यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने गौरविण्यात आले. अभिनेता, अली खान , गायक, संगीतकार दिलीप सेन, अभिनेत्री , मॉडेल. पुष्पांजली ठाकूर. सुशील जाधव , राहुल रवी, नंदू गमरे, संघराज तांबे, नियाज, राशीद, बाळा वाडियार, प्रकाश दुपारगुडे , राणी देवेंद्र यांचे अनमोल सहकार्य आणि विशेष करून अतुल चौबे, शरद रणपिसे, नरेंद्र मसूरकर, कापडिया, प्रदीप चौरसिया, महेंद्र कदम , नारायण शास्त्री , रमाकांत मुंडे, विजय तस्वीर व दिनेश पेरेसा, एफआयआर कॉमेडियन आर्टिस्ट. गोपी भल्ला , हिमाचल प्रदेश मिस हिमाचलची नवोदित नायिका . पुष्पांजलि ठाकुर , सूत्रसंचालक पूजा प्रजापती या सर्वांच्या सहकार्याने, हा पुरस्कार प्रदान सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here