युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारत संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष पदी जितेंद्र दगडू सकपाळ यांची नियुक्ती

dagadu-sapkal

मुंबई (प्रतिनिधी महेश्वर भिकाजी तेटांबे) – युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारत संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष पदी जितेंद्र दगडू सकपाळ यांना नियुक्ती पत्र देऊन दादर येथील शिवसेना भवन मध्ये त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक आमदार दगडू (दादा) सकपाळ, व महाराष्ट्र शिव अंगणवाडी सेविका अध्यक्षा सारिका सावंत थडणी, UHRC चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुहास सावर्डेकर, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ.सुवर्णा कदम, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भास्कर बोदडे, महाराष्ट्र संघटन मंत्री सुजाता (ममता) सावंत, पुणे अध्यक्षा पूजा पाटील आदी सर्व मान्यवर उपस्थित होते.

UHRC संपूर्ण मुंबई टीमच्या वतीने हा सत्कार सोहळा संपन्न झाला. सत्कारप्रसंगी खासदार संजय राऊत यांनी मार्गदर्शन करताना आपली संघटना मजबूत करून आपल्याकडून लोकोपयोगी कामं घडोत अश्या सदिच्छा दिल्या. याप्रसंगी मुंबई महासचिव. अमोल वंजारे मुंबई उपाध्यक्ष शाम भिंगारदिवे, आसिफ गौरी, दादर ब्लॉक अध्यक्ष सचिन जोईजोडे, कुर्ला ब्लॉक अध्यक्ष सलीम शेख व आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

satkar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here