आटपाडी तालुक्याच्या विकासात पत्रकारांचे मोलाचे योगदान

atpadi-patrakar

आटपाडी (प्रतिनिधी) – क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी यांना आटपाडीत सर्वप्रथम आणण्यात आणि पाणी चळवळीचे रणशिंग फुंकण्यात आटपाडीतील पत्रकारांचे मोलाचे योगदान होतेच तथापि अनेक महत्वपूर्ण विकास कामात पत्रकारांची भूमिका निर्णायक ठरल्याची भावना ज्येष्ठ पत्रकार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी बोलून दाखविली .

पत्रकार दिनाच्या निमित्ताने शासकीय विश्रामधामवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत आहे . आटपाडीचे तहसीलदार सचिन लंगुटे, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुधीर पाटील, रोहीत गभाले, अॅड . सचिन सातपुते इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते . आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . आटपाडी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सतिश भिंगे यांच्या निवडी बद्दल त्यांचा तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून उपस्थित पत्रकारांना शुभेच्छा देण्यात आल्या .patrakar-sangh-aatpadi

तहसीलदार सचिन लंगुटे, पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी पत्रकारांना शुभेच्छा देताना आटपाडी तालुक्यातील पत्रकारांनी चांगल्या समाजपयोगी कार्यात सजगतेने प्रशासनाला साथ दयावी अशी अपेक्षा व्यक्त करून तालुक्यातील पत्रकारांच्या कार्याची प्रशंसा केली . एबीपी माझा मराठी न्युज चॅनेलचे संपादक राजीव खांडेकर हे आटपाडीचे असून व्यंकटेशतात्या माडगूळकर, शंकरराव खरात यांनीही प्रारंभी पत्रकारीताच केली . दर्शने दादा, बंडोपंत देशमुख, प्रभाकर भंडारे, शाम देशपांडे, कुमारसिंह राजेभोसले , चैतन्य पैठणकर सतिश भिंगे सह आता कार्यरत असणाऱ्या अनेक सहकार्यांनी तालुक्याच्या अनेक प्रश्नात, विकासासाठी जीवन समर्पित करीत मोलाची भूमिका बजावल्याचा उल्लेख सादिक खाटीक यांनी आपल्या भाषणात केला .

पत्रकारांचे प्रश्न, समस्या, उपाययोजना यावर विचार विनिमय करून पत्रकार भवन, पत्रकारांचे विमे, पत्रकार वसाहत बाबत चालु वर्षात मोठे प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले . यावेळी तालुका कार्यकारणी निवडण्यात आली. तसेच उपस्थितांना मास्क आणि जनसेवा दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले .उपस्थितांचे स्वागत सतिश भिंगे, प्रशांत भंडारे यांनी केले . तर सुत्रसंचालन लक्ष्मण सरगर यांनी केले . या कार्यक्रमास पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार निचळ, सुरज मुल्ला, अविनाश बाड, गणेश जाधव , सदाशिव पुकळे, तानाजी गायकवाड, मुजु तांबोळी ,बिपिन देशपांडे, अंकुश मुढे, सचिन पावणे ,सुरेश मोकाशी महादेव लांडगे ,प्रविण भिंगे विशाल इंगोले इत्यादी उपस्थित होते . तानाजी गायकवाड यांनी आभार मानले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here