बांदोडकर कॉलेज व रेल कामगार सेना व सत्य साई सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न

rail-kamgar-sena

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत आहे.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी देखील रक्तदान करण्यासाठी लोकांना आवाहन केले आहे.या आवाहनास प्रतिसाद देत विद्या प्रसारक मंडळाच्या बांदोडकर सायन्स कॉलेजचा एनसीसी विभाग रेल कामगार सेना व सत्य साई सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जगजीवनराम रेल्वे हॉस्पिटल यांच्या सहकार्याने ठाणे स्टेशन येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले.

rail-kamgar-sena-blood-donatation

या शिबिरात एनसीसीचे कमांडीग ऑफिसर कर्नल विवेक चौधरी,ट्रेनिंग ऑफिसर सुखविंदर,सीएचएम रोशन पांडे व ड्रिल इन्स्ट्रक्टर अशोक वाळवे यांनी भेट देऊन रक्तदान केले.तसेच बांदोडकर कॉलेजचे प्राचार्य डॉ.मोझेस कोलेट,उपप्राचार्य प्रा.सुरेंद्र बापट व कॅप्टन सौ.माधवी जोशी यांनी शिबिरास भेट देऊन रक्तदात्यांचे मनोधैर्य वाढविले.

सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी बांदोडकर कॉलेजचे एनसीसी प्रमुख कॅप्टन बिपिन धुमाळे व सेवानिवृत्त प्रा.प्रकाश माळी, समाजसेवक गरे सर,रेल्वे हॉस्पिटलचे डॉक्टर्स,नर्सेस व स्टाफ तसेच एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय परिश्रम घेतले.या शिबिरात ११६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here