महाराजा श्री अग्रसेन चौक नामांतरासाठी ठाणे महापालिकेचे आभार

maharaja-agarsen

अग्रवाल संमेलनाने दिला महापौरांना धन्यवाद

ठाणे (विशेष प्रतिनिधी जगदीश काशीकर) – ठाणे महापालिकेने प्रभाग क्र. 4 येथील हिरानंदानी मेडोज चौकाचे नाव महाराजा श्री अग्रसेन चौक ठेवण्याचे निर्णय घेतले असून अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाच्या राष्ट्रीय चिटणीस सौ. सुमन अग्रवाल यांनी या निर्णयावर हर्षोल्लास व्यक्त करत महापौर नरेश म्हस्के यांच्यासह ठाणे महापालिकेला ह्रदयातून धन्यवाद व आभार दर्शविले आहे.

ठाणे शहरात अग्रवाल समाजातील जवळपास 20 हजार कुटुंब वास्तव्यास आहेत. येथील हा मारवाड़ी समाज सामाजिक कार्यामध्ये सातत्याने अग्रेसर असतो. ठाणे शहरात महाराजा अग्रसेन यांचे भव्यदिव्य स्मारक उभे राहावे, याकरिता अग्रवाल समाजाची फार पूर्वीपासून मागणी होती. अखेर, ठाणे महापालिकेने हिरानंदानी मेडोजच्या जवळील चौकाचे नामांतर महाराजा अग्रसेन यांच्या नावावर करून अग्रवाल समाजाच्या मागणीची आंशिक पूर्तता केली आहे, म्हणून, मारवाडीज इन ठाणे या संस्थेच्या् अध्यक्षा व सुप्रसिद्ध समाजसेविका सौ. सुमन अग्रवाल यांनी महापौरांसह महापालिका प्रशासनाचे धन्यवाद व्यक्त केले असून सोबतच, त्यांनी ठाम विश्वास वर्तविले आहे की ठाणे शहरातील हितासाठी मारवाडी समाजाचे योगदान सातत्याने राहिले व यापुढेही राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here