सातारा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – शिक्षक आमदार प्रा. जयवंतराव आजगावकर यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी कॉलेज येथे झालेल्या कार्यक्रमात शिक्षकांच्या समस्या व प्रश्न मांडताना, सातारा जिल्ह्याचे कलाध्यापक संघाचे अध्यक्ष उमेश देशमुख यांनी शाळा तथा कला व क्रीडा शिक्षक निवृत्त कला शिक्षकांच्या रिक्त पदावर कला शिक्षक नेमावा. यासह अनेक प्रश्न व मागण्या माननीय आमदार प्रा. श्री जयवंतराव आसगावकर यांच्यापुढे मांडल्या.
व्यासपीठावर उपस्थित डावीकडून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री.शेजवळ, रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव व शिवाजी विद्यापीठाचे माजी प्राध्यापक कुलगुरू अशोक भोईटे, रयत शिक्षण संस्थेचे सचिव विठ्ठल शिवणकर, रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव माध्यमिक संजय नागपुरे व छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उपप्राचार्य श्रीमती पूजा मॅडम यांची उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.







