महाराष्ट्र पत्रकार संघ ठाणे जिल्हा आयोजित कार्यक्रमात पत्रकारांचा सत्कार

thane-maharshtra-patrakar-sangh

ठाणे (विशेष प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) – ठाण्यातील सावरकर नगर मधील संकल्प शाळेत महाराष्ट्र पत्रकार संघ ठाणे जिल्हा आयोजित दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्म जयंती दिनानिमित्त पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमात पत्रकारांचा पत्रकार भूषण पुरस्कार २०२१ देऊन सत्कार करण्यात आला.

maharashtra-patrkar-sangh-thane

महाराष्ट्र पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष डॉ.राज परब, ज्योती परब कार्यक्रम प्रमुख पाहुण्या स्पॅरोताई फाउंडेशन अध्यक्षा डॉ ज्योती परब, कार्यक्रम अध्यक्षस्थान दत्ता घाडगे यांनी भूषविले.( ऑल इंडिया न्यूज पेपर डिस्ट्रिब्यूटर असोसिएशनचे सचिव ,ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोशिएशनचे अध्यक्ष ,संघटनेचे विभाग प्रमुख दत्ता घाडगे )या सर्वांनी आपल्या भाषणात पत्रकारांचे कौतुक केले.

या सोहळ्याला महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ राज परब, डॉ.प्रकाश माळी, राजेंद्र गोसावी, पत्रकार सुभाष शांताराम जैन, निशिकांत महाकाळ, अमोल हडकर,जयंत भावे, रघुनाथ अडसुळे, ज्योती परब उपस्थित होते.

सचिन देशमाने, गणेश जाधव,उमेश वांद्रे,दिपक कुरकुंडे, प्रफुल्ल गांगुर्डे, किशोर केळूस्कर, गणेश कुरकुंडे,सौ.अनुपमा गुंडे,कु.सारीका साळूंके, दत्ता घाडगे, रमेश ठाकूर, राजेश दाभोलकर, या पत्रकारांना सृतिचिन्ह प्रमाणपत्र पत्रकार भुषण २०२१ मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.सुत्रसंचालन निशिकांत महाकाळ यांनी केले.आभार प्रदर्शन प्रकाश माळी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here