मुंबई (प्रतिनिधी) – दर्पणकार पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून मुंबई वृत्तपत्र लेखक संघाच्यावतीने आयोजित कोरोना योद्धा वृत्तपत्र लेखक छायाचित्रकार पत्रकार कवी लेखक सामाजिक कार्यकर्ते सुभाष शांताराम जैन यांचा सत्कार सन्मान पत्र आमदार मनिषा कोयंडे मा.मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे डॉक्टर कुशल कोयंडे यांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रम दादर मुंबई येथील धुरु हॉल येथे संपन्न झाला. कोरोना महामारी डॉक्टरच्या काळात विविध वृत्तपत्रीय लिखाणाचे सामाजिक जनजागृतीचे कार्य केले.त्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.







