बाजार सावंगी (प्रतिनिधी मुनीर शाह) – खुलताबाद तालुक्यातील आणेवारी जाहीर मात्र काही मंङळात 46 पैसे तर काही मंङळात 47 पैसे जाहीर करन्यात आली आहे यामुळे नुकसानात होरपळलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे
तालुक्यातील ऑगस्ट ते ऑक्टोबर या 3 महिन्यांच्या कालावाधीत अतिवृष्टीने खरीप पीकांचे नुकसान झाले होते मात्र त्या आधीची जाहीर झालेली पैसे वारीची आकङेवारी ही जास्त यासाठी शेतकऱ्यांना मदत मिळण्यास अडथळा निर्माण झाला होता. आपल्या मंङळाची व तालुक्याची पैसेवारी जास्त लावल्याची माहीती मिळताच भाजपा अ तालुकाध्यक्ष सत्तार पटेल लोणीकर यांनी खुलताबादचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांचेकङे धाव घेतली व संपूर्ण तालुक्याची आणेवारी कमी करून शेतकऱ्यांना न्याय द्या असे निवेदन सादर केले.
या निवेदनाची दखल घेत तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी ताक्ताळ तालुक्याच्या सर्व तलाठ्यानां आणेवारीविषयी पुन्हा सर्व्हे करण्याचे आदेश दिले. सर्व तलाठ्यांनी योग्य सर्व्हे करुन तालुक्याची अंतिम पैसेवारी ४६ तर काही मंडळात ४७ अशी जाहीर केली. पिकांच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपये भरून पीकविमा काढला. विमाधारक शेतकऱ्यांना आता पैसेवारी कमी झाल्याने पिकविमा मिळण्यासाठी लाभ होणार आहे.







