प्रवीण पवार यांना अभिजित राणे युथ फौंडेशनचा समाजभूषण पुरस्कार प्रदान

pravin-pawar-mumbai

मुंबई (प्रतिनिधी) – मुंबईतली प्रसिध्द उद्योगपती व समाजसेवक प्रवीण पवार यांना नुकताच गोरेगाव येथील केशव गोरे सभागृहात आयोजक अभिजीत राणे युथ फौंडेशनच्या वतीने कै वीर लक्ष्मणराव अण्णाजी राणे स्मृती समाजभूषण पुरस्कार 2020 देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रवीण पवार यांनी कोरोना लॉकडाउन काळात गोर गरीब वंचित व हातावर पोट असणारे व रस्त्यावर दैनंदिन वस्तू विकून गुजराण करणाऱ्या कुटुंबीयांना किराणा किट व इतर जीवनावश्यक वस्तू देऊन मदत केली होती व याची दखल घेऊन त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आल्याची माहिती आयोजक अभिजीत राणे व गणेश हिरवे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here