लायन्स क्लबतर्फे बार्शी येथील कोरोनायोध्दा पोलिसांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

lions-club-barshi-police-medical-camp

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. कोरोना लॉकडाऊन काळातही क्लबने आपलं कर्तव्य बजावलं. आता, कोरोना कालावधीत दिवस-रात्र झटणाऱ्या पोलीस यंत्रणेच्या आरोग्याची काळजी घेऊन क्लबने आपली सामाजिक जबाबदारी निभावलीय.

बार्शीतील कोविड योद्धे व सतत व्यस्त राहणारी आपली पोलीस यंत्रणा, स्वतःकडे दुर्लक्ष करून रात्रंदिवस कर्तव्य बजावते. या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे आरोग्य उत्तम व तंदुरुस्त रहावे या उद्देशाने क्लबच्यावतीने डॉ. निनाद माढेकर, डॉ. स्नेहल माढेकर यांनी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.

बार्शी ग्रामीण रुग्णालयात याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सोलापूर ग्रामीणचे पाेलिस उपाधिक्षक धाराशिवकर, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक जायपत्रे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी व महिला कर्मचाऱ्यांचे बीपी, शुगर, ऑक्सिजन लेवल, नैरॉपॉथिक चेकअप करण्यात आले. तसेच, गरजेनुसार वैद्यकीय सल्ला व उपचारही दिले.

पोलीस यंत्रणेमुळेच आपण सुरक्षित असून त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं ही आपलं कर्तव्य आहे, त्यामुळेच हे शिबीर घेण्यात आल्याचे लायन्स क्लबच्या अध्यक्ष सीमा अमर काळे मनोगत भाषणात सांगितले. पोलीस निरिक्षक जयपात्रे यांनी या उपक्रमाबाबत क्लबचे आभार मानले.

दरम्यान, या कार्यक्रमासाठी व्हॉइस मल्टिपल कॉऊंन्सिलीग चेअरमन ला.जितूभाई दोशी, सचिव ला. सुजाता मुथा, खजिनदार ला.तृप्ती दोशी, ला. संजय खांडवीकर, ला.महावीर शहा, ला. नितीन मुथा, ला.राहुल दोशी, ला. राजेश खाडे, ला. सचिन दोशी, ला.मनिष रुगले, ला. वर्षा खांडवीकर, ला. मीना जैन, ला. सपना दोशी, ला. सोनल गुळमिरे, ला.अपर्णा शिराळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला. अमर काळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here