भोकरदनमध्ये कंटेनर खाली चिरडून तरुण ठार

bhokardan-accident

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – कंटेनर ट्रक व दुचाकीत झालेल्या अपघातात तरुणाचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी 12 जानेवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातील भोकरदन – जालना मुख्य रस्त्यावरील गिरणारे हॉस्पिटल समोर घडली. शेख कलीम शेख रईस (18) रा.उस्मानपेठ भोकरदन असे या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील उस्मानपेठ भागातील रहिवाशी शेख कलीम हा तरुण काही कामानिमित्त शहरातील जालना रोडवरील गिरणारे हॉस्पिटल परिसरात आला होता. येथील काम आटोपून तो दुचाकीने निघाला असता भोकरदनहुन जालन्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने जोराची धडक दिली. या धडकेनंतर कलीम हा कंटेनरच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याचा चिरडून जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर जवळपास अर्धा तास मृतदेह जाग्यावर पडून होता. यादरम्यान दोन्हीकडील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या घटनेचा पोलीसांकडून पंचनामा सुरू असून, प्रेत ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. आई वडिलांना होता एकुलता एक दरम्यान या अपघातात ठार कलीम हा आई वडिलांना नऊ वर्षांनंतर झालेला एकुलता एक मुलगा होता. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here