पत्रकारदिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे ठाणे नागरिकचे संपादक सतीशकुमार भावे यांचा सत्कार

maharashtra-rajya-patrakar-sangh-thane

मुंबई (संपादक सुनिल पाटील) – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ “ठाणे जिल्हा व पालघर जिल्हा एकत्रित पणे मोठ्या उत्स्फूर्तपणे ठाण्यातील गडकरी लॉन्स गार्डन मध्ये ६ जानेवारी २०२० रोजी आयोजित करण्यात आला.कार्यक्रम परसनाथजी.आर .राय यांच्या अध्यक्षतेखाली नितीन शिंदे (ठाणे जिल्हा अध्यक्ष व पालघर संपर्क प्रमुख) आणि विकास शिवराम पाटील (पालघर जिल्हाद्यक्ष) यांच्या उत्कृष्ट नियोजन नुसार पार पडला.

satishkumar-bhave-editior-thane-nagarik

या कार्यक्रमाला मनोज शिंदे (काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव), कर्मवीर.सुनील खांबे(रिपाई राष्ट्रीय संघटक), डॉ.राजेश मढवी (भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष), युवराज बांगर (ठाणे तहसीलदार), अधिक पाटील(तहसीलदार गोवंडी), अप्पासाहेब चासकर(ज्येष्ठ संपादक) यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते ठाणे नागरिकचे संपादक सतीशकुमार भावे व इतर पत्रकारांचा उत्कृष्ट पत्रकार व संपादक “पत्रकार गुणगौरव सन्मानमुर्ती पुरस्कार”देऊन सन्मानित करण्यात आले.

satishkumar-bhaveमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सर्व सभासद आणि मराठी बाणा न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम योग्य प्रकारे पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here