नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि. कुबेर जाधव) – केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांसंदर्भात काल सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर करून या कायद्यांवर विचार करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन केली. त्यात भारतातून शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांची निवड झाली आहे. ही निवड म्हणजे युगात्मा शरद जोशींच्या विचारांची सुप्रीम कोर्टाने घेतलेली दखल आहे.
अनिल घनवट यांनी आयुष्यभर शेतकरी संघटनेच्या विचारांवर राखलेल्या निष्ठांचा हा विजय असून, त्यांची या चार सदस्यीय समितीवर निवड झाल्याने, महाराष्ट्रभरातील कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करून शेतकरी संघटवेच्या विचारांचा झेंडा अनिल घनवट नवी दिल्लीतही कणखरपणे फडकावतील, असा विश्वासही या शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.







